विराटचा आणखी एक विक्रम

आरसीबीच्या विजयात सिंहाचा वाटा उचलणाऱया विराट कोहलीने आपल्या आयपीएल कारकीर्दीतील 51 वे अर्धशतक साजरे करत शिखर धवनच्या 50 अर्धशतकांच्या विक्रमाला मागे टाकत सर्वाधिक अर्धशतके झळकावण्याचा हिंदुस्थानी फलंदाजाचा मान मिळवला.

पंजाबविरुद्ध सामन्यात 77 धावांची खेळी करत विराट कोहलीने 51 अर्धशतकांचा आकडा गाठला. या कामगिरीसह आयपीएलमध्ये सर्वाधिक अर्धशतक ठोकणारा पहिला हिंदुस्थानी फलंदाज बनला. हा विक्रम याआधी शिखर धवनच्या नावावर होता. धवनने या स्पर्धेत आतापर्यंत 50 अर्धशतके नोंदवली आहेत. महत्त्वाचे म्हणजे, आयपीएलमध्ये सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फलंदाजाच्या यादीत दिल्ली कॅपिटल्सचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर विराट कोहलीचा दुसरा क्रमांक आहे. या यादीत शिखर धवन (50 अर्धशतके) तिसऱ्या, रोहित शर्मा (42 अर्धशतक) चौथ्या आणि एबी डिव्हिलियर्स 40 अर्धशतकांसह पाचव्या क्रमांकावर आहे.