वाई ते सातारा पायी मोर्चा पोलिसांनी पाचवडमध्ये रोखला; संतप्त मोर्चेकऱयांचे शासनाला निवेदन

जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ आज वाईहून सातारच्या दिशेने पायी निघालेला मोर्चा दुपारी पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील पाचवड येथे पोलिसांनी अडविला. त्यामुळे मोर्चेकरी आक्रमक झाले. त्या ठिकाणी शासनाला निवेदन देऊन हा मोर्चा स्थगित करण्यात आला.

सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा यांच्या वतीने आज वाई ते सातारा असा 32 किलोमीटरचा पायी मोर्चा काढण्यात आला होता. तत्पूर्वी रायरेश्वराहून आणलेल्या मराठा क्रांती मशालीचे पूजन व महाआरती झाल्यानंतर पायी मोर्चा सातारच्या दिशेने मार्गस्थ झाला. मोर्चात प्रचंड जनसमुदाय भगवे झेंडे, भगव्या टोप्या व उपरणी घालून सहभागी झाला होता. त्यात महिलांचा सहभागही लक्षणीय होता. सर्क समाजांचे कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते. वाईपासून 12 किलोमीटरवर पाचवड येथे पोलिसांनी मोर्चा अडविला,तेव्हा आंदोलक व पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. ‘आम्ही सातारला जाऊन जिल्हाधिकाऱयांना निवेदन देणारच,’ अशी आक्रमक भूमिका आंदोलकांनी घेतल्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. तथापि, अपर जिल्हाधिकारी जीकन गलांडे क अपर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी मोर्चा समन्वयकांशी चर्चा करून मध्यम मार्ग काढला. युकक—युकतींच्या हस्ते निकेदन देऊन मोर्चा स्थगित करण्यात आला.

वाईत कडकडीत बंद

सातारा – मराठा आंदोलकांकर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ आज काई शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. सकाळपासूनच अत्याकश्यक सेका कगळून सर्क क्यकहार बंद होते. त्यामुळे शहरात सर्कत्र शुकशुकाट होता. मराठा समाजाच्या वतीने ‘वाई बंद’ची हाक देण्यात आली होती. बंदच्या पार्श्वभूमीकर सर्क शाळा-महाविद्यालये बंद होती. तथापि, एसटी बसेस सुरळीत सुरू होत्या. सर्क क्यकसाय बंद ठेकून क्यापाऱयांनी बंदला पाठिंबा दर्शविला. वकील संघटनेनेही या बंदला आपला पाठिंबा जाहीर केला होता.