रोडामाइन-बी म्हणजे काय? का घातली कर्नाटक सरकारने बंदी… वाचा सविस्तर

कर्नाटक सरकारने बाजारात मिळणाऱ्या खाद्य पदार्थांमध्ये वापरण्यात येणाऱ्या रोडामाइन-बी कृत्रिम रंगाच्या वापरावर बंदी घातली आहे. मात्र हे रोडामाइन-बी म्हणजे नेमके काय? आणि त्याचे दुष्परिणाम जाणून घेऊया…

बाजारात मिळणारे खाद्य पदार्थ आकर्षक आणि टिकाऊ ठेवण्यासाठी फूड कलर आणि प्रिझर्व्हेटिवसचा वापर केला जात आहे. फूड कलर्स आणि त्यात मिसळली जाणारी रसायने आरोग्यासाठी धोकादायक आहेत.

Rhodamine B म्हणजे काय?
Rhodamine B (RhB) हे एक रासायनिक संयुग आहे जे सामान्यत: रेशीम, ताग, चामडे, कापूस आणि लोकर तसेच सौंदर्यप्रसाधने आणि प्लास्टिक उद्योगांमध्ये रंगविण्यासाठी कृत्रिम रंगामध्ये वापरले जाते. त्याच बरोबर याची किंमत कमी असल्याने फूड कलरिंगसाठी देखील उत्तम पर्याय मानले जाते.

हे कंपाऊंड वारंवार फूड कलंरट म्हणून विशेषत: मिरची पावडर, तेल यांसारख्या वस्तूंमध्ये बऱ्याचदा अधिक प्रमाणात आढळून येते. यामुळे त्वचेची आणि डोळ्यांची जळजळ, श्वासोच्छवासाच्या समस्या आणि कार्सिनोजेनिसिटीसह आरोग्य धोके दर्शवतात.

रोडामाइन-बी वर बंदी का आहे?
फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया नुसार, अन्न सुरक्षा आणि मानके (फूड प्रॉडक्ट्स स्टँडर्डस आणि फूड अॅडिटीव्ह) विनियम, 2011 मध्ये परवानगी दिल्याशिवाय अन्नामध्ये रंग वापरण्यास मनाई आहे.
परवानगी असलेले सिंथेटिक कलरिंग एजंट

– लाल : Ponceau 4R, Carmoisine, Erythrosine

– पिवळा : Tartrazine, Sunset Yellow FCF

– निळा : Indigo Carmine, Brilliant Blue FCF

– हिरवा : Fast Green FCF

पदार्थांमधील रोडामाइन-बी कसे शोधायचे?
– 2 ग्रॅम निवडेलेला पदार्थ ट्यूबमध्ये घ्या.
– त्यामध्ये 5 मिली अॅसीटोन टाका.
– अॅसीटोनच्या थरांच्या रंगाचे निरीक्षण करा.
– त्या ट्यूबमधील पदार्थामध्ये तात्काळ लाल रंग दिसल्यास त्यामध्ये रोडामाइन-बी असल्याचे दर्शवते.

रताळे लाल दिसण्याकरीता त्यामध्ये रोडामाइन-बी फवारले जाते.कसे शोधायचे?
– एक कापसाचा गोळा पाण्यात किंवा वनस्पती तेलात बुडवून घ्या.
– रताळ्याच्या बाहेरील पृष्ठभागावर कापसाचा गोळा घासा.
– कापसाचा गोळा स्वच्छ राहिल्यास रताळे खाण्यासाठी सुरक्षित आहे.
– कापसाचा गोळा लाल किंवा जांभुळसर झाल्यास त्यामध्ये रोडामाइन-बी ची भेसळ दर्शवते.