ब्राह्म मुहूर्ताच्या वेळी कोणती कामे करू नयेत, जाणून घ्या

ब्राह्म मुहूर्ताची वेळ ही शास्त्रात सर्वात चांगली वेळ मानली जाते. ब्राह्म मुहूर्त धार्मिक, आध्यात्मिक कार्य आणि मानसिक शांततेसाठी उत्तम वेळ मानली जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, पहाटे 4 ते 5.30 पर्यंतची वेळ ही ब्राह्म मुहूर्ताची वेळ मानली जाते. ही वेळ म्हणजे दिवसभरातील सगळ्यात शुभ वेळ मानली जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, या वेळेत काही कामे वर्ज्य मानले जाते. याविषयी जाणून घेऊया –

– ब्राह्म मुहूर्ताच्या वेळी मनात कोणतेही नकारात्मक विचार आणू नयेत. यामुळे व्यक्ती दिवसभर तणावग्रस्त राहू शकते.

– काही लोकांना ब्राह्म मुहूर्ताच्या वेळी उठताक्षणी चहा, कॉफी, नाश्ता करण्याची सवय असते, मात्र शास्त्रानुसार ब्राह्म मुहूर्ताची वेळ ही आहार आणि नाश्त्यासाठी वर्ज्य मानली गेली आहे.

– ब्राह्म मुहूर्तावेळी कधीही कोणत्याही व्यक्तिचा अनादर करू नका. या वेळी रागाने कोणत्याही व्यक्तिसोबत दुर्व्यवहार करण्याची चूक होण्याआधीच काळजी घ्या.

– ब्राह्म मुहूर्ताची वेळ ही शुभ मुहूर्ताची वेळ मानली जाते. त्यामुळे या वेळेत लैंगिक संबंध करू नये, असे शास्त्र सांगते. या वेळी डोळे उघडताक्षणी ईश्वर भक्ती, ध्यानधारणा, ईश्वर उपासना करा.

ब्राह्म मुहूर्ताच्या वेळी काय कराल?
ब्राह्म मुहूर्ताच्या वेळी तळहाताकडे बघून ‘कराग्रे वसते लक्ष्मी करमध्ये सरस्वती| करमुले तू गोविंद प्रभाते कर दर्शनम् ||’ हा मंत्र म्हणा.