रशियाला माहिती पुरविणाऱ्या गुप्तहेर महिलेस अटक

युक्रेन युद्धादरम्यान राष्ट्राध्यक्ष ‘झेलेन्स्कीची हत्या करून पुतिनला माहिती पुरवताना एका महिलेला रंगेहात पकडले गेले. रशियाच्या राष्ट्र सुरक्षा सेवा दलाने दिलेल्या माहितीनुसार ही महिला जुलैमध्ये मायकोलायव्हला जाण्यापूर्वी झेलेन्स्कीच्या प्रवासाचा तपशील गोळा करीत होती. युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना या सर्व प्रकारची माहिती देण्यात आली आहे. या महिलेला ताब्यात घेण्यात आले असताना एका स्वयंपाकघरात मुखवटा घातलेल्या एसबीयू एजंटांनी वेढलेले चित्र आहे. मॉस्कोने अद्याप या घटनेवर भाष्य केलेले नाही.

ही महिला झेलेन्स्कीच्या दक्षिणेकडील प्रवासाच्या वेळापत्रकाबद्दल माहिती शोधण्याचा प्रयत्न करत होती.या माहितीवरूनच “मायकोलायव्ह प्रदेशावर मोठ्या प्रमाणावर हवाई हल्ला” करण्याची तयारी केली जाणार होती. झेलेन्स्की हे नियोजित हल्ल्याचे लक्ष्य होते. सुरक्षा सेवेच्या माहितीनुसार  राष्ट्रपतींच्या भेटीपूर्वी त्यांना या प्लॉटबद्दल माहिती देण्यात आली होती आणि अतिरिक्त सुरक्षा उपाय केले गेले होते. SBU ला तिच्या सगळ्या अराखड्याविषयी अधिक जाणून घ्यायचे असल्याने त्या महिलेला त्यावेळी अटक करण्यात आली नाही. संशयित महिलेने  रशियाला अत्यंत संवेदनशील माहिती पुरविल्याचा आरोप आहे. यामध्ये इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर सिस्टीम आणि दारूगोळा ठेवण्यासाठी वापरल्या जाणार्‍या गोदामांच्या माहितीचा समावेश आहे.

ही महिला ओचाकिव नावाच्या एका छोट्या गावात राहत होती. झेलेन्स्कीने येथे गेल्या महिन्यात भेट दिली होती – आणि तिथल्या लष्करी तळावर एका दुकानात ती काम करत होती. SBU च्या निवेदनानुसार, महिलेने युक्रेनमधील लष्करी सुविधांचे फोटो आणि व्हिडिओ काढले होते. या महिलेवारीवरील सर्व आरोप सिद्ध झाल्यास तिला 12 वर्षांपर्यंत तुरुंगवास भोगावा लागेल.