शीव पुलाचे काम लटकणार, पाडकामाची तारीख टळली, पुढच्या तारीखचा पत्ता नाही

दहावी-बारावीची परीक्षा, माहीमची जत्रा आणि आता पुन्हा शिल्लक परीक्षांमध्ये व्यत्यय येऊ नये अशा कारणांमुळे शीव पुलाचे आज मध्यरात्रीपासून होणारे तोडकाम पुन्हा अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आले आहे. पुलाच्या पाडकामासाठी पुढची तारीख नक्की नसल्याने पाडकाम रखडणार आहे. परिणामी शीव पुलाचे बांधकामही लटकणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, निवडणुकीच्या धामधुमीत प्रचाराला फटका बसू नये म्हणून पूल तोडला नसल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पुलाचे काम रखडले तर पुढील प्रस्तावित विधानसभा, पालिका निवडणुका पाहता या पुलाचे काम डिसेंबरपर्यंत रखडण्याची शक्यता आहे.

मध्य रेल्के मार्गाकरील शीक स्थानकातील 110 कर्षे जुना ब्रिटिशकालीन रोड ओक्हर पूल काहतुकीसाठी धोकादायक झाला आहे. त्यामुळे रोड ओक्हर पूल पाडून नक्याने पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. सुरुवातीला माहीमची जत्रा असल्याने तर नंतर दहाकी क बाराकीच्या परीक्षा असल्याने परीक्षा संपल्यानंतर पुलाचे काम हाती घेण्यात येईल असे जाहीर करण्यात आले होते. तर आता 27 मार्चच्या मध्यरात्रीपासून पूल पाडण्याचे नियोजित करण्यात आले होते. मात्र अजूनही अनेक परीक्षा बाकी असल्याने पूल तोडू नये अशी मागणी करण्यात येत आहे. तर पूल पाडण्यासाठी आवश्यक परवानग्या, वाहतुकीचे नियोजन करण्यात आले असले तरी पूल पाडण्यासाठी तारीख निश्चित नसल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

असे होणार पुलाचे काम

n शीव रेल्वेवरील रोड ओव्हर पूल सद्यस्थितीत 40 मीटर लांब आहे. तो 51 मीटरपर्यंत वाढवण्यात येणार आहे. अहवालानुसार हा पूल दोन स्पॅनवर असून त्याचा एक खांब रेल्वे मार्गावर आहे. नवीन पूल एकाच स्पॅनवर असेल आणि रेल्के मार्गावर खांब नसेल.
n मध्य रेल्वेने पालिकेच्या समन्वयाने या पुलाची पुनर्बांधणी व नवीन रस्ता बांधण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन रोड ओव्हर पूल बांधणीसाठी मध्य रेल्के 23 कोटी रुपये तर नवीन रस्ता बांधण्यासाठी मुंबई महापालिका 26 कोटी रुपये खर्च करणार आहे.