मृत्यूला कवटाळणाऱ्या शेतकऱ्यांप्रती संवेदना जपण्यासाठी एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन

>> प्रसाद नायगावकर

देशातील पहिली शेतकरी कुटूंब आत्महत्या संबोधली गेलेली करपे कुटुंबाची आत्महत्या 1986 ला झाली. ही शासन दरबारी नोंद केली गेलेली पहिली आत्महत्या आहे .तेव्हा पासून शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरू झाले ते थांबतच नाही.व्यवस्थेने सुरू केलेली शेतकऱ्याची अवहेलना थांबवावी यासाठी राज्यभर 19 मार्चला एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन केले जाते.यवतमाळ येथील आझाद मैदानावर सुध्दा शेकडोंनी एकत्र येऊन करपे कुटुंबाला श्रध्दांजली वाहिली आणि शेतकऱ्याप्रति आपल्या सह वेदना व्यक्त केल्या. सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणा, शेतमालाला हमीभाव नाही, अवकाळी पाऊस आदी कारणांनी कंटाळून गतवर्षीच्या जानेवारी ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत 2478 शेतक-यांनी मृत्यूला कवटाळले असल्याची अधिकृत आकडेवारी खुद्द राज्य शासनाने जाहीर केली असून सर्वाधिक आत्महत्या अमरावती व मराठवाड्यात झाल्याच्या उघड झाले आहे.

दि.19 मार्च 1986 रोजी चिलगव्हाण या यवतमाळ जिल्ह्यातील साहेबराव करपे यांनी शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणे आणि शेतकरी विरोधी ह्या धोरणामुळे शेतकऱ्यांना सातत्याने येणारे अपयश हेच कर्पे पाटील यांच्या कुटुंबाच्या आत्महत्याचे मुख्य सूत्र होते. साहेबराव करपे पाटील त्यांची पत्नी मालती, अनुक्रमे तीन मुली विश्रांती, मंगला, सारिका व मुलगा भगवान ह्यांनी वर्धा जिल्ह्यातील दत्तपूर आश्रमात विषयुक्त अन्न प्राशन करून आपले जीवन सामूहिकरीत्या संपविले. या दुर्दैवी घटनेला आज 38 वर्षे पूर्ण झालीत .महाराष्ट्रातील ही पहिली शेतकरी आत्महत्या मानली जाते . कुटुंब करपे पाटील यांच्या मृत्यूपासून आतापर्यंत देशभरात किती अन्नदात्यांचे बळी गेले असतील याची आकडेमोड कुठल्याही संवेदनशील मनाला घायाळ करणारी असल्याने बळीराजाच्या आत्मघाताला पायबंध बसावा आणि शेतकरी हिताचे धोरणे आखले जावीत यासाठी एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. यवतमाळ येथील आझाद मैदानावर सुध्दा शेकडो लोकांनी आज दिवंगत करपे कुटुंबियांना श्रद्धांजली वाहिली आणि शेतकऱ्यांप्रति आपल्या संवेदना व्यक्त केल्या .

या प्रसंगी शेतकरी आंदोलक मनीष जाधव,अनुप चव्हाण,प्रवीण देशमुख( माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद, यवतमाळ), कलावती ताई बांदुरकर, प्रा.घनश्याम दरणे, प्रा.सीमा शेटे, प्रा.किशोर बुटले, प्रा.प्रवीण भोयर, हिरानंद मिश्रा,अशोक भुतडा, सुरज खोब्रागडे, शोभाताई पारधी,विनय मीरासे, संकेत लांबट, अर्पित शेरेकर, प्रवीण इंझळकर,प्रलय टीप्रमवार,वसंतराव शेळके,रवी माहुरकर, स्नेहल रेचे,ज्ञानेश्वर गायकवाड,विनोद दोंदल,उमाकांत परोपटे,श्रीयुत पारधी, प्रमोदीनी रामटेके, वर्षा निकम, अनिल गायकवाड,हरी विजय राठोड,हरीश कुडे,प्रा. सरकटे,प्रा.राठोड, पंढरी पाठे,हरिदास रामटेके,अतिक शेख,सचिन मनवर,मीनल जगताप, ऍड.सीमा तेलंगे,श्वेता ठाकरे,श्रध्दा चौधरी,वीणा गोतमारे,प्रशांत वानखेडे, निलेश ठोंबरे,प्रवीण भोयर,सुनयना येवतीकर,अनिता गराड,कीर्ती चाटाळे,जय शिंदे,आशिष गजभार,अभिषेक गाडेकर,स्वराज मोडक,गौरव गेडेकार,अविनाश चंद्रवंशी,रवींद्र नेहारे,रेश्मा आसूटकर,मनीषा डोहे,दिशा पिंगे,नेहा राठोड,नेहा दिडसे,कोमल राठोड,आसिका धूर्वे,अश्विनी चव्हाण,राधा देशमुख,जया मोहितकर,मीनल दांडगे,अंकिता लोहे,गौरी देशमुख,गायत्री जुमनाके,निलेश ठोंबरे,राजीव नीलावार,सिद्धार्थ मुजमुले,किशोर राठोड,प्रशांत बोराडे,अनिल गायकवाड,श्वेता ठाकरे,जय राठोड,तन्वी राठोड,रवी माहुरकर,वसंतराव शेळके,आशिष महल्ले,नयन लुंगे, अभिषेक राऊत,सक्षम वानखेडे,महेश कदम,किशोर चीचकार, प्रा.प्रदीप राऊत,पवन थोटे,रमेश उघडे,सुरेश तिरसंगे,विजय निवल आदी मंडळी उपस्थित होती.शेतकऱ्यांचे शोषण थांबवण्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न जारी ठेवू अशी प्रतिज्ञा सगळ्यांनी केल्या नंतर कार्यक्रमाची सांगता झाली.