हेलिकॉप्टरवाली कार; स्वप्न पूर्ण करण्यासाठी वेगळा प्रयोग

वेगळा व्यवसाय करण्याच्या ध्यासातून एका इसमाने वॅगनर कारचे रुपांतर हेलिकॉप्टरमध्ये केले आहे. हे अनोखे
हेलिकॉप्टर आकर्षणाचा पेंद्रबिंदू ठरले आहे. अनेकजण हा हटके प्रयोग बघण्यासाठी येत आहेत. या प्रयोगातून तरुणाला व्यवसायाचा मार्ग सापडला आहे.

उत्तरप्रदेशातील बिजनौर जिह्यात राहणाऱया गंगाराम सिंह यांनी एक कल्पना प्रत्यक्षात उतरवली. त्यांनी हेलिकॉप्टरसारखी कार बनवली. गंगाराम यांनी युटयूबवर एक व्हिडियो पाहिला होता. त्यानंतर गंगाराम यांनी कोलकाता येथील युटयूबरशी संपर्क साधला आणि कारचे रुपांतर हेलिकॉप्टरमध्ये करून घेतले. त्यासाठी गंगाराम वॅगनारने कोलकाता येथे गेले. कोलकाताच्या दुर्गापूरमध्ये अब्दुल आणि त्याच्या टीमने कारला हेलिकॉप्टरचा आकार दिला. यासाठी गंगाराम यांनी तीन लाख रुपये खर्च केले. आम्ही कुठेही गेलो तरी ही हेलिकॉप्टरवाली कार बघण्यासाठी लोक गर्दी करतात, असे गंगाराम यांनी सांगितले.

एखादा व्यवस्या करावा असे गंगाराम सिंह यांना नेहमी वाटायचे. व्यवसाय तोपण इतरांपेक्षा हटके असावा, या दृष्टीने ते विचार करायचे. हेलिकॉप्टरवाली कार तयार करून त्यांनी आपले स्वप्न पूर्ण केले आहे. विवाह सोहळ्यासाठी या अनोख्या कारचे बुकाRग होऊ लागले आहे. विवाह सोहळ्यात वधूची एंट्री या हेलिकॉप्टरमधून होते. अशापद्धतीने गाडीतून उत्पन्न मिळण्याची आशा गंगाराम यांना वाटत आहे. भविष्यात हा व्यवसाय वाढेल असे त्यांना वाटतेय.