Lok Sabha Election 2024 : अखेर भाजपने मिंधे गटाला दाखवली जागा, रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये उमेदवारी जाहीर

ratnagiri-sindhudurg-lok-sabha-constituency

लोकसभा निवडणूक जाहीर होऊन महिना उलटून गेला तरी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवाराचा तिढा सुटला नव्हता. भारतीय जनता पक्षाचे विद्यमान राज्यसभा सदस्य नारायण राणे व शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांचे बंधु किरण सामंत या दोघांनी याच मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा हट्ट धरला होता. मात्र भाजपच्या दबावापुढे हतबल झालेल्या मिंधे गटाला ही जागा सोडावी लागली असून भाजपने नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे मिंधे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाल्यानेउदय सामंत आणि किरण सामंत यांनी तातडीने पत्रकार परिषद घेत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून विनायक राऊत यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. मंगळवारी 16 एप्रिल रोजी जोरदार शक्ती प्रदर्शन करत खासदार विनायक राऊत यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. आता येथून भाजपने नारायण राणे यांना तिकीट दिले आहे. त्यामुळे येथे विनायक राऊत आणि नारायण राणे यांच्यात थेट लढत होणार आहे.

Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी होणार, विनायक राऊत यांचा उमेदवारी अर्ज दाखल

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघातून शिवसेनेचे विनायक राऊत गेल्या दोन्ही (2014 आणि 2019) निवडणुकीत विजयी झाले आहेत. दोन्ही निवडणुकीत विनायक राऊत यांनी नारायण राणे यांचे सुपुत्र निलेश राणे यांचा दारुण पराभव केला होता.