कतरिना कैफ शाकाहारी

बॉलीवूडमधील अभिनेत्री कतरिना कैफ आणि बॉलीवूड अभिनेता विक्की कौशल ही जोडी प्रचंड लोकप्रिय जोडप्यांपैकी एक आहे. लग्नाच्या अनेक महिन्यांनंतर विक्कीने पत्नी कतरिनाचे एक गुपित सर्वांसमोर उघड केले आहे. कतरिना ही शुद्ध शाकाहारी आहे, असे गुपित विक्की कौशलने उघड केले आहे. कतरिनाशी विवाह केल्यानंतर लग्नानंतरचे नेमके आयुष्य कसे चाललेय, याविषयी विक्की भरभरून बोलला आहे. कतरिना कैफला शाकाहारी जेवण पसंत आहे. तिला छोले-भटुरे प्रचंड आवडतात. टिंडे, बीन्स आणि तुरईसारखे पारंपरिक जेवण पसंत आहे, हे पाहून आई सुनेवर प्रचंड खूश आहे, असेही विक्की म्हणाला. आपल्याला जेवण बनवता येत नाही, परंतु चहा बनवणे आणि अंडे बनवणे मी शिकलो आहे, असेही विक्की म्हणाला.