मुंबई विद्यापीठाच्या निवृत्त कर्मचारी मंचाच्या ऋणानुबंध स्मरणिकेचे प्रकाशन

मुंबई विद्यापीठ, लेखा विभाग, निवृत्त कर्मचारी मंचाचे स्नेह संमेलन व मान्यवरांचे हस्ते ऋणानुबंध स्मरणिका 2024 चा प्रकाशन सोहळा 2 फेब्रुवारी रोजी पार पडला. यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु मा. रवींद्र कुलकर्णी उपस्थित होते. डॉक्टर अशोक फर्डे- उपकुलसचिव, मानव संसाधन विकास विभाग हे कार्यक्रमाचे अध्यक्ष व डॉक्टर मैनोदीन शौकत अली शेख- उपकुलसचिव, लेखा व वित्त विभाग हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमास निवृत्त लेखा विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येत उपस्थित होते.

यावेळी कुलगुरूंनी निवृत्त कर्मचायांचे अनेक समस्या शासन दरबारी मांडल्याअसून लवकरच सकारात्मक परिणाम दिसतील, असे मार्गदर्शन पर भाष्य केले. तर अध्यक्षीय भाषणात डॉक्टर फर्डे यांनी निवृत्त कर्मचायांस उचित वेळेत पेन्शन मिळण्यात येत असलेल्या प्रयत्नांचे स्वरूप सादर करत निवृत्त कर्मचाऱ्यांयांना आश्वासित केले.

यावेळी मंचाचे कार्यवाहक रामराव देसाई, राघवेंद्र जोशी, सुभाष बागडे, विवेकानंद गिरकर उपस्थित होते. मुंबई विद्यापीठ जागतिक स्तरावर प्रथम दहा क्रमांकात येण्याकरिता आम्हा निवृत्तांची मदत हवी असल्यास संपूर्ण सहकार्य मिळेल, अशी निवृत्त कर्मचारी मंचाकडून ग्वाही देण्यात आली. निवृत्त कर्मचारी शैलेंद्र सोरटे, कृष्णा जेठवा, आनंद कोलगे, उर्मिला कांबळे यांनी सुश्राव्य गायन करून रसिकांचे मनोरंजन केले. ऋणानुबंध स्मरणिका 2024 मध्ये सहभागी सर्व लेखकांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. स्नेहसंमेलन यशस्वी करणाऱ्या सहकाऱ्यांनाही सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.