
राज्यातील विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 11 जागांसाठी उद्या मतदान पार पडणार आहे. 17 पैकी 6 जागांवर महायुतीचे उमेदवार आधीच बिनविरोध विजयी झाले आहेत. त्या 6 जागा वगळता उद्या नाशिक, सोलापूर, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड, भंडारा-गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशीव-बीड-लातूर, परभणी-हिंगोली, नागपूर, छत्रपती संभाजीनगर-जालना इथे मतदान पार पडणार आहे. सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होईल.































































