लाखनी येथून भंडाराच्या दिशेने रक्तपेढीसाठी रक्त घेऊन निघालेल्या वाहनाला आग

लाखनी येथून भंडाराच्या दिशेने येत असलेल्या रक्तपेढीसाठी रक्त घेऊन जाणाऱ्या गाडीला अचानक भीषण आग लागली. सदर घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील खुटसावरी फाटा येथे घडली. गाडीने पेट घेतल्याची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली मात्र अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहचे पर्यंत गाडी जळून खाक झाली. या गाडीमध्ये नेमके किती रक्त होते आणि आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)