100 कोटींच्या पॉन्झी घोटाळ्यात अभिनेते प्रकाश राज यांना ईडीचे समन्स

ज्वेलर्सशी संबधित 100 कोटींच्या पॉन्झी घोटाळ्यात अभिनेते प्रकाश राज यांना ईडीने समन्स बजावले आहे. अभिनेते प्रकाश राज हे प्रणव ज्वेलर्सचे ब्रँड अॅम्बेसेडर होते. या ज्वेलर्सने 100 कोटी रुपयांची पॉन्झी योजना चालवत ग्राहकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी ईडीने प्रकाश राज यांना समन्स बजावले आहे.

अभिनेते प्रकाश राज यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) एका ज्वेलर्सशी संबधित कथित 100 कोटी रुपयांच्या पॉन्झी योजनेच्या चौकशीसाठी समन्स बजावले आहे. राज हे प्रणव ज्वेलर्सचे ब्रँड अॅम्बेसेडर होते. या ज्वेलर्सने हा घोटाळा केल्याचा आरोप आहे. ईडीने पॉन्झी योजना चालवल्याचा आणि गुंतवणूकदारांना 100 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी तमिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये चेन्नईसह अनेक ठिकाणी शाखा असलेल्याज्वेलर्सच्या शाखांवर छापे टाकले होते.

प्रण ज्वेलर्सचे ब्रँड अॅम्बेसेडर असलेल्या प्रकाश राज यांनी अद्याप याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. प्रणव ज्वेलर्सने चालवलेले स्टोअर ऑक्टोबरमध्ये बंद केले आणि तक्रारींच्या आधारे, तामिळनाडूच्या त्रिची येथील आर्थिक गुन्हे शाखेने मालक, माधन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. या महिन्याच्या सुरुवातीला मालक आणि त्याच्या पत्नीविरुद्ध लुकआउट नोटीसही जारी करण्यात केली होती. ईडीने म्हटले आहे की, प्रणव ज्वेलर्सने सोने गुंतवणूक योजनेच्या नावाखाली 100 कोटी रुपये गोळा केले होते. या योजनेत चांगला परतावा देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, गुंतवणूकदारांना परतावा आणि गुतंवणूक केलेली मूळ रक्कमही मिळालेली नाही. अशा प्रकारे ज्वेलर्सने ग्राहकांची फसवणूक केली आहे. प्रणव ज्वेलर्स गुंतवणूकदारांना रक्कम परत केलेली नाही. प्रणव ज्वेलर्स आणि इतर संबंधित व्यक्तींनी सराफा/सोन्याचे दागिने खरेदीच्या नावाखाली सार्वजनिक निधी इतर ठिकाणी वळवून जनतेची फसवणूक केली, असे ईडीने म्हटले आहे.