जम्मू-काश्मिरमधील शांतता भंग करण्यासाठी पाकिस्तानचा घुसखोरीचा डाव; लष्करी अधिकाऱ्याची माहिती

हिंदुस्थानने जम्मू कश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानचा तिळपापड झाला आहे. जम्मू कश्मीरमधील हे कलम हटवल्यानंतर पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय स्तरावर जम्मू कश्मीरमध्ये मानवाधिरांची पायमल्ली होत असल्याचा कांगावा केला. मात्र, त्याकडे कोणत्याही देशाने लक्ष दिले नाही आमणि पाकिस्तान तोंडावर आपटला. तसेच या घटनेनंतर पाकिस्तानातून मोठ्या प्रमाणात घुसखोरीचे प्रयत्न होत आहेत. याबाबत लष्करी अधिकाऱ्याने महत्त्वाची माहिती दिली आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावरून पाकिस्तानच्या कांगाव्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. तसेच पाकिस्तान आर्थिंक संकटात अडकला आहे. त्यामुळे हिंदुस्थानविरोधात त्यांच्या छुप्या कारवाया सुरू आहेत. पाकिस्तान दहशतवाद्यांचे सुरक्षित आश्रयस्थान असल्याचे जगजाहीर आहे. आता पाकिस्तानातून जम्मू कश्मीरमधील शांतता भंग करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लष्कराचे नॉर्दन कमांडचे अधिकारी म्हणाले की, जम्मू काश्मिरमधील शांतता भंग करण्यासाठी पाकिस्तानातून दहशतवादी घुसखोरी करत आहेत आणि यो गोष्टीला पाकिस्तानकडून प्रोत्साहन मिळत आहे. मात्र, आपले जवान सतर्क असून दहशतवाद्यांचा घुसखोरीचा डाव हाणून पाडण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.