चंद्रकांत पाटील, बावनकुळेंच्या ताफ्याला काळे झेंडे दाखविले

खेड तालुका मराठा क्रांती मोर्चा यांच्या वतीने आज भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व पॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला. ‘एक मराठा लाख मराठा’, ‘या सरकारचं करायचं काय, खाली डोपं वर पाय’, ‘या सरकारचा निषेध असो’, ‘एक मराठा लाख मराठा’, ‘जय जिजाऊ जय शिवराय’ अशा घोषणा देण्यात आल्या.

राजगुरू नगर येथे मराठा आरक्षणासाठी गेल्या 1 ऑक्टोबरपासून साखळी उपोषण मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी सुरू केले. 1 ऑक्टोबरला जुन्नर येथून कार्यक्रम झाल्यानंतर पुण्याकडे जाताना राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी या मराठा साखळी उपोषण स्थळी येऊन भेट घेतली. मात्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील हे शिरूर लोकसभा भेट दौऱ्याप्रसंगी नारायणगाव येथून पुण्याकडे जाताना त्यांनी मात्र राजगुरू नगर बायपासवरून जाण्याचा निर्णय घेतला. यावरून मराठा साखळी उपोषण स्थळाला भेट देण्याऐवजी पळ काढल्याने संतप्त झालेल्या मराठा बांधवांनी महामार्गावर येऊन काळे कापड हातात धरून घोषणाबाजी केली.