CAA विरोधात अभिनेता विजय मैदानात; तमिळनाडू सरकारकडे अंमलबजावणी न करण्याची केली मागणी

तमिळ अभिनेता आणि तमिळगा वेत्री कळघम (TVK) पक्षाचा अध्यक्ष थलापथी विजय याने सोमवारी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने नागरिकत्व (दुरुस्ती) कायदा, 2019 लागू केल्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका केली.

31 डिसेंबर 2014 पूर्वी हिंदुस्थानात आलेल्या पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगाणिस्तानमधील मुस्लिमवगळून अन्य स्थलांतरितांना जलद नागरिकत्व देण्यासाठी संसदेने वादग्रस्त कायदा मंजूर केल्यानंतर चार वर्षांनी केंद्राने नियम अधिसूचित करून CAA लागू केला.

ट्विटरवर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात विजय म्हणाले की, CAA लागू करणे ‘स्वीकार केले जाणार नाही’.

‘देशातील सर्व नागरिक सामाजिक सौहार्दाने राहतात अशा वातावरणात देशातील नागरिकत्व सुधारणा कायदा 2019 (CAA) सारख्या कोणत्याही कायद्याची अंमलबजावणी करणे योग्य होणार नाही’, अशा आशयाचे विधान त्यांनी ट्विट केले आहे.

तमिळनाडूमध्ये कायद्याची अंमलबजावणी होणार नाही याची काळजी घेण्याची विनंतीही त्यांनी तमिळनाडू सरकारला केली.

या कायद्याची तमिळनाडूमध्ये अंमलबजावणी होणार नाही याची नेत्यांनी काळजी घ्यावी, असं त्यांनी निवेदनात म्हटलं आहे.