चिल्ड्रन वेल्फेअर सेंटर विधी महाविद्यालयाला नॅकचा दर्जा

चिल्ड्रन वेल्फेअर सेंटर (सीडब्लूसी) ट्रस्ट, मालाड पश्चिम, मार्वे रोड येथील चिल्ड्रन वेल्फेअर सेंटर विधी महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. या कॉलेजला ‘नॅक’कडून मानाचे ‘नॅक’ बी  ++ हे मानांकन मिळाले आहे.

सन 2010 मध्ये या विधी महाविद्यालयाचे संस्थापक व शिक्षणमहर्षी प्राचार्य अजय कौल यांनी या संस्थेची स्थापना केली. कायद्याचे समग्र शिक्षण 3 वर्षे व 5 येथे देण्यात येते. आज मुंबईत हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच संस्थांना ‘नॅक’चा दर्जा मिळाला आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत विविध अभ्यासक्रम सुरू करण्याचा संस्थेचा मानस आहे. विविध विद्यापीठांशी सामंजस्य करार करून सीडब्लूसीला स्वतंत्र युनिव्हर्सिटीचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न करू असे प्राचार्य अनंत कळसे यांनी सांगितले. या यशामागे महाविद्यालयाचे संस्थापक शिक्षणमहर्षी प्रा. अजय कौल यांचे सहकार्य असल्याचे प्राचार्य अनंत कळसे यांनी व्यक्त केले.