राज्यसभेच्या सभापतींवर ओरडल्याने तृणमूल काँग्रेसच्या खासदाराचे निलंबन

राज्यसभेमध्ये तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्यात आज जबरदस्त खडाजंगी झाली. भडकलेल्या डेरेक यांनी सभापतींच्या दिशेने पाहात आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. यामुळे सभापतींनी त्यांना निलंबित केले. पावसाळी अधिवेशन संपेपर्यंत त्यांना निलंबित करण्यात आले आहे.

राज्यसभेमध्ये तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांच्यात आज जबरदस्त खडाजंगी झाली. भडकलेल्या डेरेक यांनी सभापतींच्या दिशेने पाहात आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. यामुळे सभापतींनी त्यांना निलंबित केले. पावसाळी अधिवेशन संपेपर्यंत त्यांना निलंबित करण्यात आले आहे. औचित्याच्या मुद्दावरून या खडाजंगीला सुरुवात झाली. सभापतींनी ओ ब्रायन यांना प्रश्न विचारला होता की औचित्याचा मुद्दा काय आहे ? यावर डेरेक यांचा आवाज चढत गेला. डेरेक यांचे म्हणणे होते की आम्ही मणिपूरसंदर्भात चर्चेला तयार आहोत, मात्र भाजपला हवी आहे तशी चर्चा आम्ही करणार नाही. यावरून सभापती रागावले होते. औचित्याचा मुद्दा काय आहे हे सोडून जर सदस्य इतर गोष्टींवर भाषण देणार असेल तर ते चालणार नाही असे सभापतींनी बजावले होते.

कोणत्या नियमाअंतर्गत तुम्ही औचित्याचा मुद्दा मांडत आहात ते सांगा असं विचारलं असता डेरेक यांनी नियम सांगत विरोधक मणिपूरवर चर्चेची मागणी करत आहेत असं ओरडून सांगितलं. त्यांचा आरडाओरडा पाहून सभापतींनी त्यांना सत्र संपेपर्यंत निलंबित केले.