संकटकाळात संपर्कासाठी एमएसआरडीसी आणि ‘वी’ची हातमिळवणी, मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर मिळणार सुविधा

मुंबई-पुणे एक्सप्रेसवे वर आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधणे शक्य व्हावे यासाठी महामार्गावर आपत्कालीन दूरध्वनी केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या केंद्रांच्या माध्यमातून वाहनचालक महामार्ग पोलीस नियंत्रण कक्षाशी संपर्क साधू शकतील. हा महामार्ग 95 किलोमीटरचा असून या मार्गावर दर दोन किलोमीटरवर ही केंद्रे सुरू करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि ‘वी’ कंपनीने यासाठी सामंजस्य करार केला आहे. ही केंद्रे आणि नियंत्रण कक्ष यांमध्ये निरंतर संवादासाठी ‘वी’ सहकार्य करेल तर प्रवाशांच्या समस्या, तक्रारी जाणून घेऊन त्या दूर करण्याचे काम रस्ते विकास महामंडळ करेल.