बलात्कार करताना चिमुरडी रडली म्हणून पायाने गळा दाबत हत्या, मृतदेहासोबतही केला बलात्कार

उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये क्रौर्याची परिसीमा गाठणारे एक प्रकरण उघडकीस आले आहे. एका नराधमाने 3 वर्षाच्या निष्पाप मुलीचे अपहरण केले आणि एका निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केली. यानंतर तिचा  मृतदेह फेकून देत तो पळून गेला. ही घटना गोरखपूरच्या चिलुआतल पोलीस स्टेशन हद्दीतील नवापर कथूर गावातील आहे.

4 दिवसांपूर्वी नवापर कथूर गावात 3 वर्षांची चिमुरडी झोपलेली असताना तिला नराधमाने पळवून नेसे. निर्जन स्थळी नेऊन त्याने तिच्यावर बलात्कार केला.यावेळी वेदनेने ही मुलगी रडायला लागल्याने या नराधमाने तिला जमिनीवर आपटले आणि नंतर पायाने तिचा गळा दाबत तिला ठार मारले. ही चिमुरडी मृत पावल्यानंतरही हा नराधम शांत झाला नाही त्याने या चिमुरडीच्या मृतदेहासोबतही बलात्कार केला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले आहे. सीसीटीव्ही आणि आणि गावकऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनीया नराधमाच्या मुसक्या आवळल्या आहेत.

5 ऑगस्टच्या रात्री चिलुआतल पोलीस स्टेशन हद्दीतील नवापर कथूर गावातील महिला आपल्या माहेरी आली होती.  ही महिला आपल्या 3 वर्षाची चिमुरडीसोबत दारालगतच झोपली होती.पहाटे 3 ते 4 वाजेच्या सुमारास या महिलेला जाग आली तेव्हा तिची मुलगी तिच्या शेजारी नव्हती. यामुळे घाबरलेल्या महिलेने आणि तिच्या घरच्यांनी मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली. मुलगी सापडत नसल्याने घरच्यांनी पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी तपास सुरू केला असता घरापासून जवळच अर्धवट बांधलेल्या घरात या निष्पाप बालिकेचा मृतदेह सापडला. मुलीच्या आईने ही मुलगी आपलीच असल्याचे ओळखले. या मातेचा हंबरटा ऐकून पोलिसांच्याही हृदयाला पीळ पडला होता. पोलिसांना महिलेचा पती, तिचा प्रियकर आणि कुटुंबीयांवरच संशय होता. चिमुरडीच्या पोस्टमॉर्टममध्ये तिच्यावर बलात्कार झाला असल्याचे निश्पन्न झाले होते. पोलिसांनी एका तरुणाची हालचाल संशयास्पद वाटल्याने त्याला ताब्यात घेतले आणि त्याची चौकशी केली.  पोलिसी हिसका दाखवताच या आरोपीने आपला गुन्हा कबूल केला.

घटना सांगताना पोलीस अधीक्षकांना अश्रू अनावर

पोलीस अधीक्षक गौरव ग्रोवर यांनी सांगितले की, आरोपी मिथिलेश विश्वकर्मा 3 वर्षांपूर्वी त्याच्या भाचीवर बलात्कार केल्याप्रकरणी तुरुंगात गेला होता आणि ज्या दिवशी ही घटना घडली त्याच दिवशी तो जामिनावर बाहेर आला होता. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर तो दारूच्या नशेत आपल्या मोठ्या भावाशी भांडण केलं होतं आणि तो घरातून निघून गेला. रात्री संधी मिळताच त्याने या बालिकेचं अपहरण केलं होतं. ही घटना सांगत असताना अधीक्षकांना आपले अश्रू अनावर झाले होते.