गौतम अदानींच्या मानगुटीवर पुन्हा हिंडेनबर्ग! वायरकार्ड घोटाळ्याशी केली तुलना

अदानी उद्योगसमुहाचे गौतम अदानी गेल्यावर्षी अब्जाधीशांची यादीत घोडदौड करत होते. या दरम्यान या वर्षाच्या सुरुवातीला अमेरिकेतील शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्गने अदानींबाबतचा अहवाल प्रकाशित करत आर्थिक गैरव्यवहारांचा आरोप केला. तसेच याबाबत 88 सवाल केले होते. त्यानंतर अदानी यांच्या सर्व शेअरमध्ये जबरदस्त घसरण झाली आणि ते अब्जाधीशांच्या यादीतही घसरू लागले. आता पुन्हा हिंडेनबर्ग अदानींच्या मानगुटीवर बसला आहे. हिंडेनबर्गचे संचालक नॅट अँडरसन यांनी एक्सवर एक पोस्ट करत अदानींवर बॉम्ब फोडला आहे.

या पोस्टमध्ये हिंडेनबर्गने अदानी घोटाळ्याची तुलना जर्मनीच्या वायरकार्ड घोटाळ्याशी केली आहे. यावेळी त्यांनी आर्थिक घोटाळा किंवा शेअरमध्ये अफरातफरीचा आरोप केलेला नाही. मात्र, अदानी समुहाने फायनाशियल टाईम्सचे पत्रकारांवर टीका केल्यानंतर हिंडेनबर्गने ही पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये म्हटले आहे की, एका लेखावरून फायनाशियल टाईम्सचे पत्रकार डॅम मॅक्रम यांच्यावर अदानी समुह टीका करत आहे. याआधी असाच प्रकार जर्मनीच्या वायारकार्ड कंपनीने केला होता. ती कंपनी जर्मनीतील सर्वात जास्त फसवणूक करणारी कंपनी होती. या वायरकार्ड कंपनीशी हिंडेनबर्ग यांनी अदानी समुहाची तुलना केली आहे. त्यामुळे हिंडेनबर्ग अदानींची पाठ सोडायला तयार नाही, असे दिसून येत आहे.

वायरकार्ड एक पेमेंट सिस्टीम आहे. 2018 पर्यंत त्यांनी विस्तार केला आणि त्यांचे बाजारमूल्य 17 अब्ज युरोपर्यंत पोहचले होते. त्यानंतर पत्रकार डॅम मॅक्रम यांनी एका लेखात वायरकार्डमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला. जून 2020 मध्येही वायरकार्डने त्यांच्या बॅलेसशीटमधून सुमारे 1.9 अब्ज युरो गायब झाल्याचे मान्य केले होते.

फायनाशियल टाईम्सने एका लेखात गौतम अदानी यांचे भआऊ विनोद अदानींशी संबधित दोनजण बर्म्यूडातील ग्लोबल अपॉर्च्युनिटीज फंडचा वापर करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. अदानी समुहाने हे सर्व आरोप फेटाळून लावत अदानीसमुहाची प्रतीमा मलीन करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले होते. त्यानंतर हिंडेनबर्ग यांनी एक पोस्ट करत अदानींवर बॉम्ब फोडला आहे.