‘जवान’ची 1 हजार कोटींची कमाई

अभिनेता शाहरुख खान याच्या ‘जवान’ या चित्रपटाची जादू तिसऱ्या आठवडय़ातदेखील कायम आहे. ‘जवान’ने जगभरात तब्बल 1 हजार कोटी रुपयांची रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. विशेष म्हणजे हिंदुस्थानात ‘जवान’च्या हिंदी व्हर्जनने अवघ्या 18 दिवसांत 500 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. इतक्या कमी दिवसांत पाचशे कोटी क्लबमध्ये एंट्री करणारा हा बॉलीवूडचा पहिला चित्रपट ठरला आहे. 500 कोटी क्लबमध्ये एंट्री घेण्यासाठी ‘बाहुबली-2’ला 34 दिवस, ‘पठाण’ला 20 दिवस तर ‘गदर-2’ला 24 दिवसांचा वेळ लागला होता.