कंगनाचं डोकं सटकलेलेच, इंग्रजी येत नव्हतं म्हणून पटेलांना पंतप्रधान केलं नाही

वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच गोंधळ निर्माण करून चर्चेत राहणारी आणि आता भाजपची मंडी लोकसभा मतदारसंघाची उमेदवार असणाऱया कंगनाचं डोकं सटकलेलेच, इंग्रजी येत नव्हतं म्हणून पटेलांना पंतप्रधान केलं नाही. कंगना राणावत हिने लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्याबाबतही वादग्रस्त विधान केले आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांना इंग्रजी येत नसल्याने त्यांना पंतप्रधान केले नाही, असे कंगना म्हणाली.

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ‘एक्स’वरून पटेल यांना तिने अभिवादन केले आहे. मात्र या ट्विटमध्ये तिने महात्मा गांधी आणि पंडित नेहरूंवरही टीका केल्याने ती चर्चेत आली आहे. ‘लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल अशी व्यक्ती होती की ज्यांनी आम्हाला आजचा अखंड भारत दिला. महात्मा गांधींना खूश करण्यासाठी पंतप्रधान पदाचा त्याग केला. महात्मा गांधी यांना वाटत होते की नेहरू उत्कृष्ट इंग्रजी बोलतात. गांधींच्या निर्णयामुळे केवळ सरदार पटेल यांनाच नाही तर संपूर्ण देशाला अनेक दशकांपर्यंत नुकसान सहन करावे लागले. आपण आपले महान नेतृत्व आणि दृष्टी आमच्यापासून दूर नेली. आपल्या निर्णयाबद्दल आम्ही दिलगीर आहोत.

म्हणे देश 2014 मध्ये स्वतंत्र झाला

पंगना राणावत हिने एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना ‘भारताला 2014मध्ये स्वातंत्र्य मिळाले’ असे विधान केले होते. यामुळे ती चांगलीच ट्रोल झाली होती. मात्र तिने आपल्या वक्तव्यावर ठाम राहत आपण हे सिद्ध करू शकतो असे म्हणाली होती.