अत्यंत क्रूर व निदर्यी शासन महाराष्ट्रात असल्याचे हे लक्षण, अजित नवले यांनी राज्य सरकारला फटकारले

जालन्यातील अंतवाली सराटी गावात आंदोलनाला बसलेल्या मराठा आंदोलकांवर पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला. पोलिसांच्या लाठीचार्जात काही आंदोलक जखमी झाले आहेत. या लाठीचार्जनंतर जालन्यात तणावाचे वातावरण असून अनेक भागात जाळपोळही सुरू आहे. ‘किसान सभे’चे अजित नवले यांनी या घटनेचा निषेध करत राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत.

”मराठा समाजाच्या विविध मागण्यासाठी शांतता पणे सुरू असलेले आंदोलन दडपण्यासाठी निदर्यीपणे लाठीचार्ज करत दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आहे. सरकार साततत्याने मराठा समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करतंय. बहुतांश मराठा समाज हा शेतीवर अंवलंबून असलेला समाज आहे. शेती सध्या तोट्यात गेल्यामुळे मराठा समाजाला त्यांच्या मागण्यांसाठी आंदोलनासारखे मार्ग अवलंबवावे लागत आहे. अशा परिस्थितीत त्यांच्या मागण्यांचा सहानभूतीने विचार करण्याऐवजी त्यांच्यावर लाठीचार्ज होत असेल तर ही गंभीर बाब आहे. देशभरातील विरोधी नेते महाराष्ट्रात असताना अशा प्रकारे सामान्य जनतेवर हल्ला होणं ही अत्यंत क्रूर व निदर्यी शासन महाराष्ट्रात असल्याचे हे लक्षण आहे. किसान सभेच्या वतीन या घटनेचा व महाराष्ट्र सरकारचा तीव्र शब्दात धिक्कार करतो, अशा शब्दात अजित नवले यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.