T20 World Cup 2024 : 2022 चा विश्वचषक खेळले, पण यावेळी त्या 7 जणांना संघातून डच्चू

जुूनमध्ये होणाऱ्या टी20 विश्वचषकासाठी टीम इंडियामध्ये कोणाची निवड केली जाणार याची चाहत्यांना आतुरता लागली होती. अखेर प्रतिक्षा संपली आणि टी20 विश्वचषकासाठी टीम इंडियाच्या 15 शिलेदारांची नावं जाहिर करण्यात आली. मात्र 2022 चा टी20 विश्वचषक खेळणाऱ्या सात जणांना यंदाच्या विश्वचषकात स्थान मिळाले नाही.

अमेरिका आणि वेस्ट इंडिजच्या धर्तीवर 1 जून पासून टी20 विश्वचषकाच्या रणसंग्रामाला सुरुवाता होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक महामंडळाने (BCCI) 15 सदस्यीय संघाची आज (30 एप्रिल 2024) घोषणा केली. रोहित शर्माच्या खांद्यावर कर्णधार पदाची तर हार्दिक पंड्याच्या खांद्यावर उपकर्णधार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मात्र 2022 चा टी20 विश्वचषक खेळणाऱ्या सात जणांना बीसीआयने संघात स्थान दिले नाही. T20 World Cup 2022 ऑस्ट्रेलियामध्ये खेळवण्यात आला होता. तेव्हा कर्णधार रोहित शर्माच होता. मात्र उपकर्णधार पद केएल राहूलकडे सोपावण्यात आले होते. मुख्य यष्टीरक्षक म्हणून दिनेश कार्तिकची निवड करण्यात आली होती. मात्र या दोघांनाही 2024 च्या विश्वचषकात स्थान मिळवता आलेले नाही.

T20 World Cup 2024 : हिंदुस्थानच्या संघाची घोषणा, रोहित शर्मा कर्णधार; वाचा कोण-कोण आहे टीममध्ये…

केएल राहूल, दिनेश कार्तिक यांच्या व्यतिरिक्त टी20 विश्वचषक 2022 मध्ये दीपक हुड्डा, भुवनेश्वर कुमार, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद शमी आणि हर्षल पटेल हे सुद्धा खेळले होते. मात्र या खेळाडूंना सुद्धा आगामी विश्वचषकासाठी निवडण्यात आलेले नाही.