T20 World Cup 2024 : हिंदुस्थानच्या संघाची घोषणा, रोहित शर्मा कर्णधार; वाचा कोण-कोण आहे टीममध्ये…

टी20 वर्ल्डकपसाठी निवड समितीने हिंदुस्थानच्या संघाची घोषणा केली आहे. आयसीसीच्या नियमानुसार 1 मे पूर्वी संघाची घोषणा करायची होती. या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) टी20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वात टी20 वर्ल्डकप खेळणार आहे. टी20 वर्ल्डकपसाठी रोहित शर्मा हा टीम इंडियाचा कर्णधार असणार आहे.

टी20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियात केएल राहुल, ईशान किशन यांना स्थान मिळालेले नाही. तर विकेटकिपर म्हणून संजू सॅमसन आणि ऋषभ पंत यांना संधी देण्यात आली आहे. टी20 वर्ल्डकपसाठी बीसीसीआयच्या निवड समितीने 15 सदस्यांच्या टीमची घोषणा केली आहे. राखीव खेळाडूंमध्ये शुभमन गिल, रिंक सिंह, खलील अहमद आणि आवेश खान यांचा समावेश आहे.

मोहम्मद सिराज याला टी20 वर्ल्डकपसाठीच्या संघात स्थान मिळवण्यात यश आलं आहे. अनेक माजी खेळाडूंनी संभाव्य टीमचा अंदाज वर्तवताना सिराजला बाहेर ठेवले होते. मात्र बीसीसीआयने सिराजला संघात संधी दिली आहे. यासह शिवम दुबेनेही संघात स्थान मिळवले आहे.

अष्टपैलू खेळाडू म्हणून हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रविंद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. जलद गोलंदाज म्हणून अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह आणि सिरज यांचा समवेश करण्यात आला आहे. विराट कोहलीही संघात आहे.

मुंबईसाठी अस्तित्वाची लढाई

कोण-कोण आहे टीममध्ये? पाहा संपूर्ण संघ…

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह

राखीव खेळाडू – शुभमन गिल, रिंकू सिंह, खलील अहमद, आवेश खान