लोणीकंद पोलीस ठाणे हद्दीतील चौघे तडीपार, पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांचे आदेश

पुणे जिल्ह्यातील लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चार सराईत गुन्हेगारांवर दोन वर्षांसाठी तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी याबाबातचे आदेश दिले आहेत.

अजय राजेंद्र माकर (रा. गोरे वस्ती, वाघोली), रोहित दत्ता मंजुळे (रा. वाघोली), आकाश राजू दंडगुले (रा. वाघोली), हर्षद कुमार शिंदे (रा. लोणीकंद) अशी कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत. यातील माकर हा टोळीप्रमुख आहे. माकर व त्याच्या साथीदारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या हालचाली सार्वजनिक शांततेस व सुव्यवस्थेस धोका निर्माण करतील अशा झाल्या होत्या आणि त्यासाठी त्यांच्यावर प्रभावी प्रतिबंधक कारवाई करणे आवश्यक होते. त्यामुळे लोणीकंद पोलीस ठाण्याने आरोपींच्या विरोधात तडीपारीचा प्रस्ताव तयार करून हा प्रस्ताव परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांच्याकडे सादर केला होता.

त्यानुसार बोराटे यांनी तडीपारीचा आदेश दिला. त्यानूसार सर्व आरोपींना पुणे शहर, पिंपरी चिंचवड आयुक्तालय व पुणे ग्रामीण कार्यक्षेत्रातून पुढील दोन वर्षांकरता हद्दपार केले आहे. त्यापैकी टोळी सदस्य रोहित मंजुळे, आकाश राजू दंडगुले यांना लोणीकंद पोलिसांनी तडीपारीचा आदेश बजावला आहे.