सेक्सला नकार दिला म्हणून तरुणीची हाल हाल करून हत्या, छाटलेले मुंडके देखील शिजवले

कझाकस्तानमध्ये एका तरुणीची अत्यंत निर्दयीपणे हत्या करण्यात आली आहे. नराधमाने तिचे दात तोडले, तिची नखं उखडली व त्यानंतर तिचे मुंडके छाटून तिला मारून टाकले. इतक्यावरच तो थांबला नाही. त्याने तिचे छाटलेले मुंडके देखील शिजवले.

राखमनबर्दी तोरेबेकोव (28) असे त्या विकृत तरुणाचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. राखमनबर्दीला सूट शिवायचा होता. त्यासाठी एका फॅशन डिझायनरकडे काम करणारी अयाझन एडिलोवा (19) ज्युनियर फॅशन डिझायनर त्याचे कपड्याचे माप घ्यायला आली होती. अयाझन ही दिसायला सुंदर होती त्यामुळे राखमनबर्दीने तिच्यासोबत जवळीक करण्याचा प्रयत्न केला. ती त्याला रोखत होती. मात्र त्याने थेट सेक्सचीच मागणी केली. अयाझनने त्याची ही मागणी फेटाळली. त्यामुळे त्याला खूप राग आला होता. त्याने तिला मारहाण केली. त्यानंतर मुंडके छाटून तिची हत्या केली. त्याने तिच्या तोंडातील सर्व दात व हातावरची नखेही उखडली. तो एवढ्यावरच नाही थांबला त्याने तिचे छाटलेले मुंडके एका टोपात शिजवत ठेवले.

दरम्यान अयाझन ही राखमनबर्दीच्या घरून निघाल्यानंतर तिच्या बॉयफ्रेंडसोबत नाईट आऊटला जाणार होती. मात्र ती भेटायला न आल्याने तिच्या बॉयफ्रेंडने तिच्या घरी चौकशी केली तेव्हा ती ऑफिसमधून परतली नसल्याचे समजले. ती ऑफिसमध्येही नसल्याने तिचा बॉयफ्रेंड बिथरला. त्याने पोलिसांना राखमनबर्दीच्या घरी तपास करायला सांगितले. त्यानंतर जेव्हा पोलीस राखमनबर्दीच्या घरी पोहोचले त्यांना धक्काच बसला. अयाझनचे मुंडके गॅसवर शिजत ठेवलेले होते. तर घरात तिचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता.