सरकारने मुंबईत त्रास दिल्यास रस्त्यावर मराठा दिसला पाहिजे, मनोज जरांगे-पाटील यांचे आवाहन

‘युद्ध लढावं मराठय़ांनी व जिंकावं मराठय़ांनीच’ अशी चेतना उपस्थित सकल मराठा समाजामध्ये चेतवत मुंबईमध्ये सरकारकडून त्रास दिल्यास महाराष्ट्राच्या रस्त्यारस्त्यावर मराठा दिसला पाहिजे, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले.

अंतरवाली सराटी येथून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघाले आहेत. लाखोंचा जनसमुदाय त्यांच्याबरोबर आहे. त्यांची पदयात्रा शिरूर येथील सातकमाने पुलाजवळ पुणे जिह्यात दाखल झाली. मोठय़ा व्रेनद्वारे त्यांना पुष्पहार घालण्यात आला. त्यानंतर प्रभू श्रीराम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून आरती करण्यात आली. शिरूरमध्ये त्यांनी उपस्थित मराठा बांधवांना मार्गदर्शन केले. त्यानंतर पहाटे अडीच वाजता कारेगाव- रांजणगाव गणपती येथे त्यांची सभा झाली.