मराठा आरक्षण : जालन्यातील तीर्थपुरीत बस पेटवली

जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी शहरात आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात राज्य परिवहन महामंडळाची अंबड आगाराची अंबडवरून आलेली अंबड- रामसगाव बस आज सकाळी 6 ते 7 वाजेदरम्यान अज्ञात लोकांनी जाळण्यात आली, सध्या तीर्थपूरी मार्केट बंद करण्यात आले आहे. रविवारी रात्री उशिरा अंबड तालुक्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान आज सकाळ पासून जिल्हाभरात तणावाचे वातावरण तयार झाले आहे.

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांचे सहकारी शैलेंद्र पवार यांना आज पहाटे 4 वाजता पोलिसांनी ताब्यात घेतल्याने तीर्थपूरीत तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, सरकाराच्या दडपशाहीच्या निषेधार्थ मराठा समाज आक्रमक झाल्याचे दिसून येत असून त्याचेच परिणाम म्हणून बस जाळण्यात आल्याचे समजते, तसेच तीर्थपुरी बाजारपेठ उघडली नसून व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार बंद ठेवल्याचे दिसत आहे, दरम्यान तीर्थपुरी पोलीस ठाण्याचे एपिआय साजिद अहेमद हे बंदोबस्तच्या कामी भांबेरी येथे गेले होते, त्यांनी तात्काळ तीर्थपुरी येथे धाव घेतली, त्यांनी घनसावंगी नगरपंचायतची अग्निशमक गाडी बोलावून पेटलेली एसटी विझवली. अंबड तालुक्यात पुढील आदेशापर्यंत संचारबंदी, जिल्हादंडधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी राञी उशिरा काढले आदेश काढले आहे.