मराठा समाजाचे सर्वेक्षण – प्रत्येकाला 121 प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार   

मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी येत्या 23 जानेवारीपासून प्रत्यक्ष सर्वेक्षणाला सुरुवात होणार असून या सर्वेक्षणात प्रत्येकाला 121 प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यानंतरच त्याचा फोटो व स्वाक्षरी घेऊन माहिती अपलोड करता येणार आहे.

राज्यातील सर्व जिह्यांसह महानगरपालिका, नगरपालिकांतील कर्मचाऱ्यांना या सर्वेक्षणासाठी दोन दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षणानंतर थेट सर्वेक्षणाला सुरुवात होणार असून 31 जानेवारीपर्यंत सर्वेक्षण पूर्ण करण्याच्या सूचनाही मागासवर्गीय आयोगाने दिल्या आहेत.

सदर सर्वेक्षणाची माहिती चार भागांमध्ये असणार आहे. पहिल्या भागात संबंधित व्यक्तीची मूलभूत माहिती जसे – आधार कार्ड, पॅन कार्ड इ., दुसऱ्या भागात संबंधित व्यक्तीची सामाजिक माहिती, तिसऱ्या भागात संबंधित व्यक्तीची शैक्षणिक माहिती व चौथ्या भागात आर्थिक माहिती असणार आहे.

ज्यांच्या कुणबी, मराठा-कुणबी, कुणबी-मराठा अशा नोंदी आढळून आलेल्या आहेत त्यांच्या याद्या सर्व तलाठी यांच्यामार्फत गावस्तरावर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.