प्रियकर-प्रेयसी समजून बहिण भावाला बेदम मारहाण

मध्य प्रदेशमधील छतरपूर येथे रक्षाबंधनाच्या दिवशी एका बहिण भावाला प्रियकर प्रेयसी समजून तीन जणांनी बेदम मारहाण केली आहे. या प्रकरणी छतरपूर पोलिसांनी तीन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही मारहाण बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केली असल्याचे बोलले जात आहे.

अतुल चौधरी असे मारहाण झालेल्या तरूणाचे नाव असून त्याने तो रक्षाबंधनाच्या दिवश त्याच्या बहिणीसोबत सताई मार्गावरील एका चाट सेंटरवर चाट खात उभा होता. त्यावेळी काही जण तेथे आले व त्यांनी त्या दोघांना प्रियकर प्रेयसी समजून मारहाण करम्यास सुरूवात केली. या घटनेचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.