काही मिनिटांपूर्वी भेटलेल्या तरुणीसोबत टॉयलेटमध्ये आनंद लुटला; मुलाचे व्हिडीओ पाहून आईने डोक्याला हात लावला

लुटॉन ते इबिझादरम्यानच्या विमानप्रवासात पिअर्स सॉयर नावाच्या तरुणाने केलेले पराक्रम त्याच्या आईपर्यंत पोहोचले आहेत. 8 सप्टेंबरला पिअर्सचा वाढदिवस होता. हा वाढदिवस त्याच्याही आयुष्यभर लक्षात राहील आणि त्याच्या आईलाही लक्षात राहील.

वाढदिवसाच्या दिवशी पिअर्सने दणक्यात आनंद साजरा केला. विमान आकाशात असताना तो साजरा करत असलेला आनंद हा त्याच्यासाठी खरोखर गगनात मावेनासा होता. त्याचा आनंदी जल्लोष विमानातील काही प्रवाशांनी रेकॉर्ड केला होता. हे व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड करण्यात आले. हे व्हिडीओ पिअर्सची आई एलिन हिला सोशल मीडिया साईटवर दिसले होते. ते पाहिल्यानंतर आपल्या आनंदी मुलाचे पराक्रम एलिनला कळाले होते.

एलिनने म्हटलंय की घरी टीव्ही बघत बसलेली असताना तिला पिअर्सच्या मित्रांनी सोशल मीडिया पोस्टच्या लिंक पाठवायला सुरुवात केली. या क्लिप आईने बघाव्या असा नव्हत्या. त्या क्लिप पाहिल्यानंतर एलिनलाच लाज वाटली होती. आपला मुलका सुट्टीमध्ये कुठे गेला होता, सुट्टीमध्ये त्याने काय केलं होतं हे प्रश्न आता आपण पिअर्सला कसे विचारायचे हा प्रश्न एलिनला पडलेला होता. कारण त्याने सुट्टीत काय केलं हे तिच्या आधी जगाला कळालं होतं. मुळात तिला आपला मुलगा सुट्टीसाठीबाहेर गेलाय हेच माहिती नव्हतं. या व्हिडीओमुळे तिला ते ही कळालं होतं.

घडलं काय ?
पिअर्सला विमानतळावर एक तरुणी भेटली होती. काही मिनिटांच्या ओळखीनंतर या दोघांनी आनंद लुटण्याचं ठरवलं. विमानात चढल्यानंतर त्यांना यासाठी विमानातील टॉयलेट ही जागा योग्य वाटली. दोघांनी आनंद लुटण्यास सुरुवात केल्यानंतर विमानाच्या एका सहाय्यकाला कळालं. त्याने आनंद साजरा होत असतानाच टॉयलेटचं दार उघडलं. यामुळे विमानातील सगळ्या प्रवाशांना पिअर्सचा आनंदोत्सव दिसला होता. त्यांनी हा आनंदोत्सव मोबाईलमध्ये चित्रीत केला होता आणि सोशल मीडियावर अपलोडही केला. ही तरुणी कोण आहे मला माहिती नाही असं एलिनने म्हटलं आहे. पिअर्सचा आनंदोत्सव झाल्यानंतर जेव्हा तो आणि तरुणी बाहेर आले तेव्हा प्रवाशांनी टाळ्या वाजवून त्यांच्या नावाने हुर्यो केला. सदर प्रकार विमानातील कर्मचाऱ्यांनी पोलिसांना कळवला असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.