राज्यस्तरीय संस्कृत चित्रमय पदकोष परीक्षेत नंदादीप विद्यालयाचे यश; चार विद्यार्थिनींची नेत्रदीपक कामगिरी

कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक नागपूर विस्तार सेवा मंडळ रवीकीर्ति संस्कृत अध्ययन केंद्र सांगली यांच्यातर्फे आयोजित राज्यस्तरीय संस्कृत चित्रमय पदकोश परीक्षेत नंदादीप विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरावर उज्वल यश संपादन केले. या विद्यालयाच्या चार विद्यार्थिनींनी नेत्रदीपक कामगिरी करत प्रथम, द्वितीय आणि पाचव क्रमांक पटकावला आहे.

या परीक्षेत इयत्ता सातवीतील त्रिविणी कांबळे व नम्रता अहिरे यांनी राज्यात विभागून पाचवा क्रमांक पटकावला. तर मधुरा मसूरकर हिने राज्यात द्वितीय आणि ऋतिका बाबर हिने राज्यातून प्रथम क्रमांक पटकावला. या सर्व विद्यार्थ्यांना शाळेतील संस्कृत शिक्षक साईशंकर ऐवळे यांचे मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापक अर्जुन जगधने, पर्यवेक्षक जयसिंग राजगे, समन्वयक राजश्री साळगे यांच्यासह सर्व अधिकारी आणि शाळेतील इतर शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.