बेकायदेशीररित्या पिस्तूल बाळगणारा अटकेत; येरवडा पोलिसांची कारवाई

बेकायदेशीररित्या जवळ पिस्तूल बाळगणार्‍याला येरवडा पोलिसांच्या पथकाने अटक केली. येरवड्यातील क्षिरसागर हॉल परिसरातून आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून एक पिस्तूल जप्त करण्यात आले आहे.

विकास भगत तौर (35, रा. येरवडा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. येरवडा पोलिसांचे पथक हद्दीत गस्तीवर होते. या दरम्यान क्षिरसागर हॉल परिसरात एक संशयीत थांबला असून त्याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानूसार पथकाने सापळा रचून तौर याला ताब्यात घेतले. झडतीत त्याच्याकडे पिस्तूल आढळून आले. यानूसार त्याला अटक करण्यात आली. येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, पोलीस निरीक्षक उत्तम चक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमलदार दत्ता शिंदे, तुषार खराडे, राहुल परदेशी, सुरज ओंबासे यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.