Youtube Down- यूट्यूब डाउन झाल्याने यूजर्स हैराण; लाइव्ह स्ट्रीमिंगसाठी येताहेत अडचणी

प्रसिद्ध व्हिडीओ शेअरींग सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Youtube गेल्या काही तासापासून ठप्प झाले आहे. त्यामुळे यूजर्सना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. युजर्सना YouTube वर लाइव्ह व्हिडिओ स्ट्रीम करणासाठी किंवा अन्य व्हिडीओ अपलोड करण्यासाठी अडचणी येत आहे. त्यामुळे X प्लॅटफॉर्म अनेक वापरकर्त्यांनी YouTube डाउन झाल्याची तक्रार केली.

डाउन डिटेक्टरच्या अवहालानुसार, गेल्या 24 तासात 63 टक्के वापरकर्त्यांना व्हिडीओ स्ट्रीमिंग करण्यासाठी समस्यांचा सामना करावा लागला आहे. तर अनेकांना ट्विटरमध्ये देखील व्यत्यय येत असल्याचं दिसत आहे. यामधील 15 टक्के युजर्सना YouTube च्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासही समस्या येत आहे. यामुळे युजर्सचा संताप होत आहे.

Youtube Down

मार्चमध्येही ही समस्या निर्माण झाली होती

गेल्या महिन्यात 5 मार्च रोजी यूट्यूब डाऊन झाले होते. तेव्हा देखील युजर्सना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. डाउन डिटेक्टरच्या अहवालानुसार, सुमारे 43 टक्के वापरकर्त्यांना यूट्यूब वेबसाइट चालवताना समस्यांना सामोरे जावे लागले, तर 20 टक्के वापरकर्त्यांना ॲपवर व्हिडिओ स्ट्रीमिंग करताना समस्यांना सामोरे जावे लागले होते. या काळात लाखो लोकांनी X वरून आपल्या समस्यांबाबत तक्रारी केल्या होत्या.