पंतप्रधानांच्या कार्यक्रमाचा कोटय़वधीचा खर्च पुणे महानगरपालिकेच्या माथी

pm-modi-jacket

ऑगस्ट महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर आले असता त्यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले होते. त्याबरोबर पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते पीएमआरडीए, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पुणे मेट्रो यांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झाले होते. त्या वेळच्या मंडप व बैठक व्यवस्थेसाठी 1 कोटी 85 लाख 1 हजार 469 रुपयांचा खर्च झाला होता. या खर्चाला मान्यता देण्यासाठी महापालिकेच्या स्थायी समितीसमोर हा प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 ऑगस्ट 2023 रोजी पुणे दौऱ्यावर आले होते. त्यावेळी एस.पी. कॉलेजच्या मैदानावर त्यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले होते. तसेच शिवाजीनगर येथील पोलीस परेड ग्राउंड येथे पुणे महापालिका, पीएमआरडीए, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पुणे मेट्रो यांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झाले होते. या कार्यक्रमासाठी अत्यंत कमी कालाकधीत मंडप उभारायचा असल्याने निविदा न काढता अनुभवी ठेकेदाराकडून हे काम करून घेण्याचे निश्चित केले होते. यासाठी मे. मेराकी इकेन्ट्स यांचे 1 कोटी 24 लाख 92 हजार, बालाजी मंडप डेकोरेटर्सकडून 49 लाख 8 हजार, सागर येनपुरे यांच्याकडून 2 लाख 11 हजार आणि कमलेश जडे यांच्याकडून 8 लाख 88 हजार रुपयांचे काम करून घेण्यात आले. हा सर्क खर्च 1 कोटी 85 लाख 1 हजार 469 रुपये झाला आहे. या खर्चाला मान्यता देण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्त किक्रम कुमार यांनी स्थायी समितीसमोर ठेवला आहे.