
टॅक्सचोरी आणि चित्रपटाच्या नावाखाली परदेशात पैसा पाठविल्याप्रकरणी बॉलीवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह, तिचे सासरे आणि निर्माते वासू भगनानी तसेच पॅनारोमा स्टुडिओशी संबंधित 12 ठिकाणांवर आज आयकर विभागाने एकाचवेळी छापे टाकले आहेत. चित्रपटाचे शूटिंग, परदेशी वितरण आणि प्रॉडक्शनच्या नावाखाली मोठय़ा प्रमाणात पैसा परदेशात पाठवला जात असल्याची माहिती आयकर विभागाला मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. आयकर विभाग सध्या आर्थिक कागदपत्रांची तपासणी करत आहे. या प्रक्रियेत मोठय़ा प्रमाणावर टॅक्सची हेराफेरी आणि आर्थिक अनियमितता असल्याचा संशय काही तपास यंत्रणांना आला होता. अधिकाऱयांच्या म्हणण्यानुसार, सध्या याप्रकरणी तपास सुरू असून महसूल कराशी संबंधित अनियमिततेचे मूल्यांकन केले जात आहे.



























































