58 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, रवींद्र सिंगल नागपूरचे तर अमितेश कुमार पुण्याचे आयुक्त

राज्यातील  58 आयपीएस अधिकाऱ्यांच्या आज  बदल्या करण्यात आल्या. अपर पोलीस महासंचालक रवींद्र सिंगल यांची नागपूरच्या आयुक्तपदी तर अमितेश कुमार यांची पुण्याच्या आयुक्तपदी वर्णी लागली. शिवाय दत्तात्रय कराळे यांच्याकडे नाशिक परिक्षेत्राची जबाबदारी सोपविण्यात आली असून ठाण्याचे सहपोलीस आयुक्त म्हणून ज्ञानेश्वर चव्हाण तर नवी मुंबईच्या सहआयुक्तपदी संजय ऐनपुरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांना पोलीस महासंचालकपदी बढती देऊन त्यांची होमगार्डचे महासमादेशकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर नागपूर पोलीस आयुक्त म्हणून तीन वर्षे कामकाज करणारे अमितेश कुमार यांच्याकडे पुणे पोलीस आयुक्तपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर महामार्ग पोलीस दलाचे प्रमुख रवींद्र सिंगल यांना नागपूर पोलीस आयुक्त बनविण्यात आले आहे. होमगार्ड विभागाचे उप महासमादेशक व  अपर महासंचालक प्रभात कुमार यांच्याकडे नागरी सरंक्षण दलाचे संचालकपद सोपविण्यात आले आहे. राज्य गुप्तवार्ता विभागाचे सहआयुक्त शिरीष जैन यांना अपर महासंचालकपदी बढती देऊन त्यांची राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्तपदी वर्णी लावली आहे. दीपक पांडे यांना अपर पोलीस महासंचालकपदी बढती देऊन त्यांना महिला व बाल अत्याचार प्रतिबंध विभागाच्या प्रमुखपदी कायम ठेवण्यात आले आहे.

पोलीस महानिरीक्षकांच्या बदल्या

दत्तात्रय कराळे-नाशिक परिक्षेत्र, संजय शिंदे- गुन्हे अन्वेषण विभाग, प्रवीण पवार-सहआयुक्त (पुणे शहर), प्रवीण पडवळ-प्रशिक्षण व खास पथके, संजय दराडे- कोकण परिक्षेत्र, ज्ञानेश्वर चव्हाण- सहआयुक्त (ठाणे शहर), एस. डी. एनपुरे-सहआयुक्त (नवी मुंबई), निसार तांबोळी – सहआयुक्त (राज्य गुप्तवार्ता विभाग), अनिल कुंभारे – सहआयुक्त (वाहतूक, बृहन्मुंबई), आर. एल. पोकळे-अमरावती परिक्षेत्र (बढतीने), चंद्रकिशोर मिना- दहशतवादविरोधी पथक, (बढतीने), आरती सिंह- प्रशासन (बढतीने),  एन.डी. रेड्डी- पोलीस आयुक्त (अमरावती शहर), संदीप पाटील-नक्षलविरोधी अभियान (बढतीने), वीरेंद्र मिश्रा- छत्रपती संभाजी महाराज परिक्षेत्र (बढतीने), रंजन कुमार शर्मा- आर्थिक गुन्हे शाखा (बढतीने), नामदेव चव्हाण- राज्य राखीव पोलीस बल (बढतीने). तर बी.जी. शेखर यांच्या बदलीचे स्वतंत्र आदेश काढण्यात येणार आहेत.

पोलीस उपमहानिरीक्षकपदी बढती व बदली

राजेंद्र माने- संचालक, महाराष्ट्र पोलीस अकादमी (नाशिक), विनिता साहू- अपर पोलीस आयुक्त संरक्षण व सुरक्षा (बृहन्मुंबई), एम. राजकुमार- पोलीस आयुक्त (सोलापूर शहर), अंकित गोयल -गडचिरोली परिक्षेत्र, बसवराज तेली- गुन्हे अन्वेषण विभाग, शैलेश बलकवडे-अपर पोलीस आयुक्त, गुन्हे (पुणे शहर), शहाजी उमप – अपर आयुक्त, विशेष शाखा (बृहन्मुंबई), एस.जी.दिवाण- पोलीस दळणवळण व माहिती-तंत्रज्ञान, संजय शिंत्रे- दक्षता, वस्तू व सेवा कर विभाग, मनोज पाटील- अपर पोलीस आयुक्त, उत्तर विभाग (पुणे शहर).

अधीक्षक/ उपायुक्त बदल्या

रागसुधा आर.- उपायुक्त (बृहन्मुंबई),  संदीप घुगे-सांगली, मुमक्का सुदर्शन- चंद्रपूर, धोडोपंत स्वामी- ठाणे ग्रामीण, पंकज कुमावत-अमरावती ग्रामीण, मितेष घट्टे- उपायुक्त (बृहन्मुंबई), विक्रम साळी- नियोजन व समन्वय (पोलीस महासंचालक), अनंत भोईटे- उपायुक्त (बृहन्मुंबई), संदीप पखाले- विशेष कृती गट (नक्षलवादविरोधी अभियान), रमेश धुमाळ- नागपूर ग्रामीण, समाधान पवार- उपायुक्त (बृहन्मुंबई),निमित गोयल- नागपूर शहर, राजेंद्र दाभाडे- नागरी हक्क संरक्षण (ठाणे),  पराग मणेरे- ठाणे शहर, संदीप जाधव-बृहन्मुंबई, हिम्मत जाधव-पुणे शहर, दत्तात्रय कांबळे- बृहन्मुंबई.