मोबाईलच्या डेटावरुन सासू सेनेत जुंपली, अखेर पोलिसाला करावी लागली मध्यस्थी

उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथून एक अनोखे प्रकरण समोर आले आहे. मोबाईल डेटा वापरण्यावरुन सासू सूनेत जुंपली . वाद इतका वाढला की अखेर पोलिसाला मध्यस्थी करावी लागली.

मिळालेल्या माहितीनुसार, सहारनपूरमध्ये एका कुटुंबात सासू-सून आणि मुलगा राहतात. मुलगा कामावर जात असल्याने घरात सासू-सुना दोघीच असतात. सुनेचा आरोप आहे की, ती दिवसभर घरातील कामात व्यस्त असायची त्यावेळी सासू दिवसभर तिचा फोन वापरत असते. त्यामुळे दिवसभरात मिळणारा त्याचा मोबाईल इंटरनेट डेटा रात्री संपतो.

सूनेच्या म्हणण्यानुसार, जेव्हा ती फोनवर काही बघायचे असते तेव्हा मोबाईलमध्ये डेटा नसल्याचं कळतं. या मुद्द्यावरून सासूसोबत अनेक वाद झाल्याचे तिने सांगितले. पण तरीही सासूने मोबाईल वापरणे सोडले नाही. दिवसभर ती रील बघत राहिली. मग एके दिवशी कंटाळून अस्वस्थ वाटून ती घर सोडून तिच्या माहेरी जाऊ लागली. ही बाब त्यांच्या शेजारी राहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला समजताच त्यांनी सून, मुलगा आणि सासू यांना एकत्र बसवले. बराच वेळ त्यांना समजावून सांगितले. मग सासूबाईंनी दिवसभर मोबाईल वापरणार नाही असं ठरवलं. तर सूनेनेही तिला फोन वापरण्याची परवानगी देईल असे सांगितले. अशा प्रकारे पोलीस कर्मचाऱ्याच्या मध्यस्थीने हे प्रकरण घरीच मिटवण्यात आले.