मोदींवर छोटे-मोठे रावण घेऊन निवडणूक जिंकण्याची वेळ आलीय, संजय राऊत यांची टीका

अशोक चव्हाणांनी त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी चूक केली आहे. तो फार सज्जन, सरळ माणूस होता,ते भीतीपोटी गेले आहेत असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणावर त्यांनी सडकून टीका केली. 400 पार ची भाषा करणाऱ्या भाजपला आज नांदेडची जागा जिंकण्यासाठी मोदींना अशोक चव्हाणांना घ्यावे लागत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशोक चव्हाण हे लीडर नसून डिलर असल्याचे म्हटले होते. फडणवीसांनी चव्हाणांना भ्रष्टाचारी म्हटले होते. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी प्रसिद्ध केलेल्या श्वेतपत्रिकेत आदर्श घोटाळ्याचा उल्लेख करण्यात आला आहे. हा उल्लेख आम्ही केला नसून अमित शहा, मोदींनी केला आहे. ते त्यांना भ्रष्टाचारी म्हणत होते, म्हणून आम्ही त्यांना प्रश्न विचारात आहोत की ते भ्रष्टाचारी होते मग तुम्ही आता त्यांच्याशी लव्ह मॅरेज कशाला करत आहे? असे राऊत यांनी म्हटले. संजय राऊत यांनी म्हटले की, रावणाने सीता पळवून नेली, त्या रावणाच्या भूमिकेत आज भाजप आहे. त्यांना रामाचे नाव घेण्याचा अधिकार नाही.