विधानसभेवर शिवसेनेचा भगवा फडकवा – राहुल चव्हाण

महाराष्ट्राच्या विधानसभेवर शिवसेनेचा भगवा फडकवा, असे आवाहन माढा लोकसभा मतदारसंघ निरीक्षक राहुल चव्हाण पाटील यांनी केले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने संपूर्ण राज्यभरात ‘होऊ द्या चर्चा’ अभियान सुरू आहे. वडूज येथे अभियानादरम्यान जनतेशी संवाद साधताना ते बोलत होते.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय भोसले, जिल्हा महिला संघटिका छाया शिंदे, उपजिल्हा महिला संघटिका सलमा शेख, खटाव तालुकाप्रमुख शहाजीराजे गोडसे, उपतालुकाप्रमुख संतोष दुबळे, महिला तालुका संघटक सुधा देशमुख, शहरप्रमुख सुशांत पारलेकर, माणिक घाडगे, आबासाहेब भोसले, महेश पाटील, अजित देवकर, हणमंत देवकर, मंगेश मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती.

राहुल चव्हाण पाटील म्हणाले, ‘गेल्या नऊ वर्षांपासून केंद्रातील मोदी सरकारने देशातील जनतेचं वाटोळं केलं आहे. या सरकारने गेल्या नऊ वर्षांत फक्त आश्वासनांचा भडिमार केला. जनतेला वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून वेठीस धरले आहे. खटाव तालुक्यातील पाणी प्रश्नाचे काय झाले..? तालुक्यातील एमआयडीसीचे काय झाले…? छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रातील स्मारक केले नाही, बाबासाहेब आंबेडकरांचे इंदू मिल येथील स्मारक केले नाही, फक्त घोषणा केल्या, पण अंमलात मात्र काही आणले गेले नाही. त्यामुळेच हे लबाडांचे राज्य आहे. गद्दारांना धडा शिकवा आणि 2024 मध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेवर पुन्हा शिवसेनेचा भगवा फडकवा, यासाठी कामाला लागा, असे आवाहन त्यांनी केले.

अभियानाला कवठेमहांकाळमधून सुरुवात

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून आज सांगली -सातारा जिल्हा संपर्कप्रमुख नितीन बानुगडे -पाटील व सांगली जिल्हाप्रमुख संजय विभुते यांच्या मार्गदर्शनाखाली कवठेमहांकाळ शहरातून ‘होऊ द्या चर्चा’ अभियानाला सुरुवात झाली.

यावेळी जिल्हाप्रमुख संजय विभुते, कवठेमहांकाळ तालुकाप्रमुख मारुती पवार, ज्येष्ठ नेते अनिल बाबर, शहरप्रमुख परशुराम कारंडे, उपतालुकाप्रमुख दिलीप गिड्डे, एकनाथ पवार, सागर शेजाळ, सिध्देश्वर भोसले, अजित कोलपे, बंडू पाटील यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.

अभियानाला जतमध्ये प्रचंड प्रतिसाद

तालुक्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने पश्चिम भागात मुचंडी, डफळापूर, बनाळी, शेगाव या गावांत जोरदार अभियान संपन्न झाले असून, या अभियानात भाजपने मराठा आरक्षण, धनगर आरक्षण यांचा कोणताही प्रश्न सोडवला नाही. दुष्काळी जनतेला विस्तारीत म्हैसाळ योजनेच्या कामासाठी 900 कोटींची तरतूद ही केली नाही, याची पोलखोल केली.

या अभियानात जत तालुका संपर्कप्रमुख तानाजीराव गुरव, जिल्हा उपप्रमुख सागर पाटील, तालुका उपप्रमुख शिवाजीराव पडोळकर, महिला आघाडी प्रमुख फाल्गुनी शिंदे, युवाजिल्हाधिकारी औदुंबर पोतदार, जत शहरप्रमुख ज्ञानेश्वर धुमाळ, इराण्णा पाचंगे, दोरकर, भरत गुळवे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

तानाजीराव गुरव म्हणाले, ‘भाजपने मराठा आरक्षण, धनगर आरक्षणात फसवले असून, तालुक्याच्या दुष्काळी पट्टय़ामध्ये म्हैसाळ योजनेची कामे करतो म्हणून फसविण्याचा उद्योग केला आहे. या सरकारच्या कोणत्याही योजना जत तालुक्याच्या तळागाळापर्यंत पोहोचल्या नाहीत. येणाऱया निवडणुकीत त्यांना हिसका दाखवा,’ असे आव्हान त्यांनी यावेळी केले. यावेळी जत तालुका शिवसेना संघटक अमित दुधाळ, महिला आघाडी प्रमुख फाल्गुनी शिंदे यांनी भाजपच्या धोरणावर कडाडून टीका केली.

शेतकऱयांच्या बांधावर चर्चा

‘होऊ द्या चर्चा’ या अभियानांतर्गत शिवसेनेच्या पदाधिकाऱयांनी शेतकऱयांच्या बांधावर जात त्यांच्याशी चर्चा केली. त्यावेळी शेतकऱयांनी या बोलघेवडय़ा सरकारच्या विरोधात संताप व्यक्त केला. तसेच घरोघरी जात पत्रके वाटत भाजपच्या पोकळ घोषणांची पोलखोल केली. या कार्यक्रमाला लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला.