पृथ्वीपेक्षा अडीच पट मोठय़ा ग्रहावर जीवसृष्टीचे संकेत

 

अंतराळात पाठवण्यात आलेल्या जेम्स वेब स्पेस या जगातील सर्वात शक्तिशाली दुर्बिणीने एक पाऊल पुढे टाकले आहे. ही दुर्बिण 124 वर्षे दूर एका लालबुंद ग्रहाची परिक्रमा करत आहे. या ग्रहाला ‘केटू- 18बी’ असे नाव देण्यात आले आहे. पृथ्वीपेक्षा अडीच पटीने मोठा हा ग्रह असून तो महासागराने आच्छादलेला आहे. या ग्रहावर जीवसृष्टी असण्याचे काही सकारात्मक संकेत मिळाले आहेत.