इराणमध्ये 17 वर्षांच्या मुलीवर पोलिसांनीच केले तालिबानी अत्याचार; सोशल मिडीयाद्वारे घटना उघडकीस

तालिबान…अमानूष अत्याचारांचे दुसरे नाव…तालिबानने अफगाणिस्तानला नरकयातनांमध्ये ढकलले आहे. त्याचप्रमाणे आता तालिबानी अफगाणिस्तानबाहेरही हातपाय पसरत असल्याचे दिसत आहे. अशीच एक धक्कादायक घटना इराणमध्ये उघडकीस आली आहे. या प्रकरणात एका 17 वर्षांच्या मुलीवर पोलिसांनी केलेले तालिबानी अमानूष अत्याचार केले. या घटनेतील पीडित मुलीचे छायाचित्र आणि तिची आपबिती सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

इराणमधील सोनिया शरीफी.. 17 वर्षांची मुलगी. हिजाबविरोधी आंदोलनात सक्रीय असताना पोलिसांकडून तिच्यावर केलेले अत्याचार, मारहाण एका छायाचित्रातून व्हायरल होत आहे. सोनियाने डोक्याला दुखापत झालेले छायाचित्र सोशल मिडीयावर टाकले आणि स्वत:च्या हक्कांसाठी लढल्या जाणाऱ्या आंदोलनात पोलिसांकडून केले जाणारे अत्याचार पुन्हा एकदा जगासमोर आले आहेत.

गेल्या वर्षीच्या निषेधानंतर इराणने सुरू केलेल्या क्रॅकडाऊनमध्ये किशोरवयीन मुलीला लक्ष्य करण्याची ही दुसरी वेळ आहे. ही घटना महसा अमिनीच्या दुःखद मृत्यूला एक वर्ष पूर्ण होण्याच्या साधारण एक महिना आधी घडली आहे. चार महिन्यांनंतर अब्दानानमधील आंदोलनानंतर सोनिया घरी परतली.. पण आठ महिन्यांनंतर, तिने डोक्याला दुखापत झालेले एक छायाचित्र शेअर केले, ज्यामध्ये तिला पोलिसांनी जखमी केले होते. ज्यात तिला कारमधून जबरदस्तीने ओढले, डोळ्यांवर पट्टी बांधणे आणि अपहरण आणि शारीरिक अत्याचार यांचा समावेश आहे. हेंगॉ या पोलीस कर्मचाऱ्याने हे अत्याचार केलेले आहेत. दोन तासांहून अधिक काळ धमक्या, चौकशी आणि छळ सहन केल्यानंतर सोनिया अब्दानानच्या रस्त्यावर कितीतरी वेळ एकटी पडून होती.

दडपशाहीच्या या लाटेमध्ये, 500 हून अधिक आंदोलकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत, हजारो लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. शिवाय, अनेक निदर्शकांना फाशीची शिक्षा देखील भोगावी लागली आहे. इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सने यापूर्वी डिसेंबरमध्ये सोनिया शरीफीच्या अटकेबद्दलचे वृत्त फेटाळून लावले होते आणि कथित खोट्या गोष्टींसाठी “विरोधक माध्यमांना” दोष दिला होता. पण आता पुन्हा एकदा इराणमधील तालिबानी अत्याचारांचा भीषण चेहरा जगासमोर आला आहे.