वंदितो तुम्हा कौपीनेश्वरा 

ठाणे येथील श्रीकौपिनेश्वर मंदिर म्हणजे भगवान श्रीशंकराच्या स्वयंभू आणि पुरातन मंदिरांपैकी एक आहे. श्रीकौपिनेश्वरावर एका विशेष शिवस्तुतीपर गीताची निर्मिती करण्यात आली आहे. श्रीकौपिनेश्वराच्या आराधनेसाठी दत्तदास महाराजांनी रचलेले हे ‘श्रीकौपिनेश्वराष्टक’ आहे. अधिक मासातील सोमवारी विधीपूजा करून या विशेष गीताचे लाँचिंग करण्यात आले.

‘पार्वतीवरा चंद्रशेखरा, हर महेश्वरा शंभुशंकरा’ असे  ‘श्रीकौपिनेश्वराष्टक’ चे बोल आहेत. पंडित संजीव अभ्यंकर आणि पंडित रघुनंदन पणशीकर यांनी गीत गायले आहे. गीताचे संगीतकार केदार पंडित असून चित्रफीत दिग्दर्शन नरेंद्र बेडेकर यांचे आहे. संजीव कोकीळ यांची ही निर्मिती आहे.

ठाण्यातील प्रसिद्ध श्रीकौपिनेश्वर मंदिर 9 ते 13 व्या शतकादरम्यान शिलाहार राजवटीत मंदिर निर्माण झाले आहे. सन 1760 मध्ये पेशव्यांचे सुभेदार रामाजी महादेव बिवलकर यांच्याकडून  मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे. कौपिनेश्वराच्या गाभाऱ्यात  4 फूट 3 इंच उंचीचे आणि 12  फुटांचा  घेर असलेले शिवलिंग आहे.