दहावीचा उद्या निकाल

दहावीचा निकाल सोमवार, 27 मे रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर होणार आहे. ऑनलाईन निकालात विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुण पाहता येतील, तसेच सदर माहितीची प्रिंट घेता येईल, असे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी स्पष्ट केले आहे.

निकाल पाहण्यासाठी वेबसाईट
http://maharesult.nic.in
http://sscresult.mkcl.org
http://sscresult.mahahsscboard.in
http://result.digilocker.gov.in

– गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी 28 मे ते 11 जून या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. मंडळाच्या वेबसाईटवरून विद्यार्थ्यांना अर्ज करता येईल.

– उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी विद्यार्थ्यांना प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे.

– जुलै-ऑगस्टमध्ये होणाऱया दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी व श्रेणीसुधार विद्यार्थ्यांसाठी 31 मेपासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.