महाराष्ट्रदिनी सावरकर सभागृहात रंगणार ‘सूरां मी वंदिले’

महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून वीर सेनानी आणि स्वरनिनाद फाऊंडेशन यांच्या विद्यमाने ‘सूरां मी वंदिले’ या कार्यक्रमाचे आयोजन  1 मे रोजी सायंकाळी 7 वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, शिवाजी महाराज पार्क येथे करण्यात आले आहे. मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या प्रगल्भ शास्त्राrय गायकी नाटय़गीते आणि दुर्मिळ बंदिशीवर आधारित या कार्यक्रमात स्वराधीश डॉ. भरत बलवल्ली आणि विदुषी मंजुषा पाटील हे आपली कला सादर करतील. पं. विभव नागेशकर (तबला), उस्ताद दिलशाद खान (सारंगी), मकरंद कुंडले (ऑर्गन), दादा परब (पखवाज) त्यांना साथसंगत करतील. हा कार्यक्रम सशुल्क आहे.