हवाई दलाचे विमान कोसळून दोन जवान शहीद

 

तेलंगणात हिंदुस्थानी हवाई दलाचे ट्रेनर विमान कोसळले. या अपघातात दोन जवान शहीद झाले आहेत. हा अपघात सोमवारी दुपारी परिधी रावेली येथे झाला.  आठ महिन्यांतील आयएएफच्या विमानाला झालेला हा तिसरा अपघात आहे.

या ट्रेनर विमानाने सोमवारी सकाळी दिंडीगुल येथील वायुसेना अकादमीतून उड्डाण घेतले होते. त्यानंतर सकाळी 8.55 वाजता या विमानाला अपघात झाला. अपघातानंतर हे विमान अवघ्या काही मिनिटांत जळून खाक झाले, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. हिंदुस्थानी हवाई दलाच्या ट्रेनर विमानात दोन पायलट होते. यात एक जण ट्रेनर होता.