शेअर बाजार धडाम!

आज बाजारातील घसरणीमुळे बीएसई लिस्टेड कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये सुमारे 3.5 लाख कोटी रुपयांची घसरण झाली आहे. बीएसईमध्ये लिस्टेड कंपन्यांचे एकूण मार्केट कॅपिटलायझेशन कमी होऊन 373.94 लाख रुपयांवर आली. सोमवारी 378.79 लाख कोटी रुपये होते. कंपन्यांचे मार्केट कॅप आज 4.85 लाख कोटी रुपये कमी झाले. म्हणजेच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 4.85 लाख कोटी रुपयांची घसरण झाली.

शेअर बाजारात मंगळवारी पुन्हा एकदा घसरण झाली. लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅपमधील प्रत्येक सेगमेंटमध्ये विक्री झाल्याने शेअर बाजार पुन्हा एकदा कोसळला. आयटी शेअर्समध्ये सर्वात मोठी घसरण झाली. सेन्सेक्स 736 हून जास्त अंकांनी घसरून 72 हजारांवर आला. तर निफ्टीसुद्धा 250 अंकांची घसरण होऊन 21817 अंकांपर्यंत खाली आला. बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदारांना जबर दणका बसला असून गुंतवणूकदारांचे तब्बल 4.85 लाख कोटी रुपये बुडाले. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी केवळ 6 शेअर्सला फायदा झाला. यात बजाज फायनान्स, कोटक महिंद्रा बँक, एचडीएफसी बँक, बजाज फिनसर्व आणि टायटनचा समावेश आहे. तर सर्वात जास्त घसरणाऱया शेअर्समध्ये टीसीएस, इंडसइंड बँक, विप्रो, नेस्ले इंडिया या शेअर्सचा समावेश होता.